कोल्हापूर- महापुराचा फटका 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अंजली, राणादासह इतर कलाकारांनाही बसल्याचे पाहायला मिळाले. नागाळा पार्क येथील एका सदनिकेमध्ये तुझ्यात जीव रंगलाचे कलाकार राहतात. पण, नागाळा पार्क परिसरातील अनेक सदनिकांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना तेथून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी अंजली आणि राणा सुद्धा गुडघ्या पेक्षा जास्त पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळाले.
'तुझ्यात जीव रंगला'तील राणादा, अंजली यांनाही कोल्हापूरच्या पुराचा फटका; गुडघाभर पाण्यात अडकले - कोल्हापूरचा पूर
महापुराचा फटका 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अंजली, राणादासह इतर कलाकारांनाही बसला आहे. राणादा आणि त्याच्यासोबत अंजली आणि सर्वच कलाकार पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळाले.
कोल्हापूरचा पूर
राणादा आणि त्याच्यासोबत अंजली आणि सर्वच कलाकार पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळाले. कोल्हापुरातील वसगडे या गावी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. यातील सर्वच कलाकार कोल्हापूरमध्ये वास्तव्यास आहेत. या सर्व कलाकारांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
Last Updated : Aug 7, 2019, 3:36 PM IST