कोल्हापूर -कोल्हापूरसह राज्यभरात एका चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुलगा फायनान्स कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना आपल्या घरातील परिस्थिती बिकट आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे काम नसल्याने आई आणि पप्पा सुद्धा घरात बसून आहेत, असे सांगताना पाहायला मिळत आहे. मात्र या व्हिडिओ मागचं सत्य जाणून घेतले आहे 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने
संभाजीनगर परिसरातील 'पृथ्वीराज'चा व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या जितेंद्र पाटील यांचा 9 वर्षांचा मुलगा पृथ्वीराज याचा 2 दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पृथ्वीराज घरी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या घरची परिस्थिती किती बिकट झाली आहे, हे पटवून देताना पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे हप्ता घेण्यासाठी ते आले होते. मात्र पृथ्वीराज याने तुम्ही लॉकडाऊननंतर या असे त्या कर्मचाऱ्यांना म्हंटले. मुळात पृथ्वीराजला लहान वयात आपल्या परिस्थितीची जाण आहे हे यातून दिसत असले तरी, संबंधित व्हिडिओ केवळ गंमतीने बनवला होता असे पृथ्वीराजच्या आई स्वाती पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हंटले आहे. शिवाय फायनान्स कंपनीकडून आम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास नाहीये, त्यांच्याकडून मिळालेल्या कर्जातूनच पाटील यांनी आपला छोटा व्यवसाय सुरू केला आहे. पृथ्वीराजला सुद्धा आम्ही घरात बसून आहेत याची जाणीव आहे. त्यामुळेच त्याने त्यादिवशी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही लॉकडाऊन नंतरच तुम्हाला बोलवून पैसे देतो असे म्हटल्याचे आई स्वाती पाटील यांनी सांगितले. आम्हाला काहीही त्रास नाही शिवाय मुलगा पृथ्वीराज हा थोडा बोलका असल्याने नेहमीच तो पटकन काहीही बोलून जातो. गल्लीतील अनेकजण त्याचे व्हिडिओ बनवत असतात असेही स्वाती पाटील यांनी म्हंटले.
हॉटेल व्यवसायासाठी घेतले होते कर्ज