महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महानगरपालिकेने काढलेल्या खड्डयात ट्रक फसला; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहतूक कोंडी - citizen

महानगरपालिकेने काढलेल्या खड्ड्यात ट्रक फसला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यासमोर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी येत आहे.

महानगरपालिकेने काढलेल्या खड्ड्यात एक ट्रक फसला

By

Published : Jul 8, 2019, 3:52 PM IST

कोल्हापूर- कोकणातून पांढरी वाळू घेऊन आलेला ट्रक खड्ड्यात फसल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. गेल्या पाच तासांहून अधिक वेळ ट्रक खड्ड्यात फसला असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यासमोर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

एका कामासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने हा खड्डा काढला होता पण त्या खड्ड्याच्या सभोवती कोणत्याही पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिगेट लावण्यात आले नव्हते. त्यामुळेच खड्ड्यात ट्रक फसला. ट्रकचे चाक पूर्णपणे खड्ड्यात रुतल्याने ट्रक एका बाजूने कलला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये ट्रक पलटी झाला नाही.

महानगरपालिकेने काढलेल्या खड्ड्यात ट्रक फसला
कोल्हापुरात गेल्या 24 तासांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या खड्यांमध्ये पाणी साचून वाहन चालकाला हे खड्डे दिसत नाहीयेत. त्यातूनच सकाळी 8 च्या दरम्यान हा ट्रक खड्ड्यात फसला.प्रशासनाकडून ट्रकला बाहेर काढण्यासाठी अद्यापतरी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी येत आहे.महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने असे खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत अशी नागरिकांनी मागणी केलीये.

ABOUT THE AUTHOR

...view details