कोल्हापूर- जिल्ह्यातील शिये गावामध्ये झाडावर वीज पडल्याने, झाड जळून खाक झाल्याची घटना घडली. आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वीज कोसळल्याने झाड जळून खाक ; कोल्हापूरच्या शियेमधील घटना - कोल्हापूर
शिये गावामध्ये झाडावर वीज पडल्याने, झाड जळून खाक झाल्याची घटना घडली.
वीज कोसळल्याने झाड जळून खाक
शिये परिसरात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. विजेचा कडकडाट या परिसरात जोरात सुरू होता. त्याच वेळी अचानक एका झाडावर वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर झाडाने पेट घेतला. या आगीत झाड जळून खाक झाले आहे. पाहा व्हिडीओ...