कोल्हापूर - राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर ( Tourism Minister Aaditya Thackeray on Kolhapur tour ) आहेत. काल रविवारी दुपारी शिरोळ मधल्या नृसिंहवाडी येथील श्री दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापूरात पोहोचले. कोल्हापूरात येताच त्यांनी रात्री 11 वाजता रंकाळा तलावाला भेट ( Aaditya Thackeray Visit Rankala Lake ) दिली आणि संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार राजेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.
विकास कामांचा घेतला आढावा -
नुकतेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार त्यांनी रात्री उशिरा रंकाळा तलावाच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला.