कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज हातकणंगले लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी शेट्टी बैलगाडीत बसून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत.
राजू शेट्टी आज भरणार उमेदवारी अर्ज, दसरा चौकातून रॅलीला सुरुवात - हातकणंगले लोकसभा मतदार संघ
खासदार राजू शेट्टी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बैलगाडीत बसून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत.
आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी खासदार राजू शेट्टी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यासाठी शहरातील दसरा चौकातून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात आली आहे. बैलगाडीतून ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. रॅलीमध्ये जयंत पाटील, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक,योगेंद्र यादवही सहभागी झाले आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टी विरूध्द भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात खरी लढत होणार आहे. यामुळे दोन्ही उमेदवार मतदारसंघातील गावोगावी फिरून प्रचार यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे.