महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवरात्रौत्सव : अष्टमीदिवशी अंबाबाईची महिषासूरमर्दिनी स्वरुपात पूजा - Ambabai Temple Kolhapur Navratri

शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्र आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिषासूरमर्दिनीरुपाने विहार केला, अशी आख्यायिका आहे. त्याला अनुसरूनच नवरात्राच्या अष्टमीला करवीर निवासिनीची महिषासूरमर्दिनी रुपातली अलंकार पूजा बांधली जाते.

अंबाबाई
अंबाबाई

By

Published : Oct 24, 2020, 6:39 PM IST

कोल्हापूर- आज अष्टमी म्हणजेच शारदीय नवरात्रौत्सवाचा आठवा दिवस. आज करवीर निवासिनी आई अंबाबाईची दरवर्षीप्रमाणे महिषासूरमर्दिनी स्वरुपात पूजा बांधण्यात आली आहे. आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टदशभुजा महालक्ष्मी अर्थात, दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता.

करवीरनिवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती. या रुपामध्ये जगदंबा फक्त देव मानव यांचीच नव्हे, तर अगदी दैत्यांचीसुद्धा माता आहे. म्हणूनच हे सर्वजण तिला आदराने नमन करतात. अशा परिस्थितीत मार्ग चुकलेल्या आपल्या मुलांसाठी आईला प्रसंगी कणखर व्हावे लागते. एरवीचे सोज्वळ रूप टाकून उग्र रूप घ्यावे लागते, तसेच महिषासुरासारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी करुणामय जगदंबेने महिषासूरमर्दिनीचे उग्र रूप घेतले होते.

अंबाबाईची आज महिषासूरमर्दिनी स्वरुपात पूजा

शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्र आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिषासूरमर्दिनीरुपाने विहार केला, अशी आख्यायिका आहे. त्याला अनुसरूनच नवरात्राच्या अष्टमीला करवीर निवासिनीची महिषासूरमर्दिनी रुपातली अलंकार पूजा बांधली जाते.

हेही वाचा-गृहराज्यमंत्र्यांनी साधला अंबाबाई मंदिर परिसरातील व्यावसायिकांशी संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details