महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाचे आणखी 2 बळी; मृतांची एकूण संख्या 17 वर

शहरात आणखी 2 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक इचलकरंजी शहरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शिवाय जिल्ह्यात आणखी 16 रुग्णांची वाढ झाली असून, 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

today 2 new corona positive cases found in kolhapur
कोल्हापुरात कोरोनाचे आणखी 2 बळी; एकूण मृत्यूंची संख्या 17 वर

By

Published : Jul 8, 2020, 3:31 PM IST

कोल्हापूर - शहरात आणखी 2 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक इचलकरंजी शहरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शिवाय जिल्ह्यात आणखी 16 रुग्णांची वाढ झाली असून, 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 1 हजार 28 रुग्णांपैकी 769 जणांना डिस्चार्ज तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 242 इतकी झाली आहे.

दरम्यान, कोल्हापूरातील रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक आहे. शिवाय मृत्यूदर सुद्धा राज्यात सर्वात कमी आहे. मात्र, गेल्या 2 दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याने कोल्हापूरकारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये 1 जण जण गडहिंग्लज येथील 75 वर्षांची महिला असून 1 जण कर्नाटक राज्यातील आहे. शिवाय वाढलेल्या 16 रुग्णांमध्ये नगरपालिका क्षेत्रातील 6, कोल्हापूर शहरातील 3 तर भुदरगड, चंदगड, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, शिरोळ आणि इतर राज्यातील प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 94
भुदरगड- 78
चंदगड- 118
गडहिंग्लज- 113
गगनबावडा- 7
हातकणंगले- 20
कागल- 58
करवीर- 37
पन्हाळा- 30
राधानगरी- 73
शाहूवाडी- 187
शिरोळ- 16
नगरपरिषद क्षेत्र- 113
कोल्हापूर महापालिका क्षेत्र - 62

एकूण - 1 हजार 06

पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1, नाशिक 1, आणि सातारा-2 असे इतर जिल्हा व राज्यातील 22 असे मिळून एकूण 1028 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.


जिल्ह्यातील एकूण 1028 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 769 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 17 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 242 इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details