कोल्हापूर - पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते गिरीश फोंडे यांना 'तुमचाही कॉम्रेड गोविंद पानसरे करू', अशी धमकी अज्ञात फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली आहे. यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. धमकी देणाऱ्या विरोधात कारवाई करावी यासाठी पुरोगामी डावे लोकशाहीवादी पक्ष, संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
..तर तुमचाही पानसरे करू, गिरीश फोंडे यांना फेसबुकवरून धमकी - kill
गिरीश फोंडे यांना आलेल्या धमकीचा पोलिसांनी आठ दिवसात छडा लावावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पदाधिकार्यांनी दिला आहे.
गिरीश फोंडे यांना आलेल्या धमकीचा पोलिसांनी आठ दिवसात छडा लावावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पदाधिकार्यांनी दिला आहे. घटनेची दखल घेऊन धमकी देणार्यांचा लवकरात तपास लावण्याचा प्रयत्न होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.
फोंडे यांना त्यांच्या वैयक्तिक अकाऊंटवर २० एप्रिलला अनोळखी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. खासदार राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही फोंडे आणि भगवान काटे यांनी सांगितले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर पोलिसांनी सायबर सेलच्या वतीने तपास करून संशयिताचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिले.