महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमेदवारी मागे घ्या; समरजितराजेंच्या आईंना धमकीचे फोन - राजकीय वीद्यापीठ बातमी

समरजितराजेंच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे त्यांना मानसिक ताण आणि ताप वाढल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मरजितराजेंच्या आईंना धमकीचे फोन

By

Published : Oct 8, 2019, 11:46 AM IST

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी समरजितराजे घाटगे यांच्या आईंना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. समरजितराजे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार असून त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्यांच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना पाच वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मानसिक ताण आल्याने सुहासिनीदेवी घाटगे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण कागलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- ....अन्यथा अपक्ष लढू- समरजितसिंह घाटगे

शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस दोन वेगवेगळ्या नंबरवर समरजितराजे यांच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून समरजितराजे यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी याबाबत पाच वेळा फोन केले होते. मुरगुडमधील बांध फोडून टाकीन, शेत जाळून टाकीन, आणि आपला मुलगा एकटा फिरत असतो त्यामुळे लक्षात ठेवा याप्रकारच्या धमकीमुळे घाबरलेल्या सुहासिनीदेवी घाटगे यांनी या घटनेबाबत घरच्या कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, अचानक मानसिक ताण आणि ताप वाढल्याने त्यांनी याबाबत समरजितराजेंना सांगितले. प्रचारात व्यग्र असल्याने त्यांनी याबाबत कुठेही काही बोलले नाहीत. दरम्यान धमकी ज्या नंबरवरून आली तो नंबर सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मोबाईलमधून डिलीट झाला आहे. त्यामुळे आलेल्या नंबरची लिस्ट गुन्हा नोंद झाल्यानंतर मागविण्यात आली असून ज्याने फोन केला त्याचे नाव समजू शकणार आहे. रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत पुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - प्रदुषणमुक्तीचा संदेश देत कोल्हापुरात ऋतुराज पाटीलांनी सायकलवरून भरला उमेदवारी अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details