महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात वारकऱ्यांची दिंडी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे मार्गस्थ

टाळ मृदुंगाच्या गजरात ‘माऊली माऊली...’चा जयघोष करत कोल्हापूर येथून वारकऱ्यांची दिंडी नंदवाळकडे रवाना झाली आहे. प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते.

वारकऱ्यांची दिंडी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे मार्गस्थ

By

Published : Jul 12, 2019, 12:37 PM IST

कोल्हापूर- टाळ मृदुंगाच्या गजरात ‘माऊली माऊली...’चा जयघोष करत कोल्हापूर येथून वारकऱ्यांची दिंडी नंदवाळकडे रवाना झाली आहे. प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. कोल्हापुरातूनदेखील दरवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे.

वारकऱ्यांची दिंडी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे मार्गस्थ

सकाळी येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठ मार्गे ही दिंडी सानेगुरुजी वाशी मार्गे प्रतिपंढरपूर नदंवाळकडे रवाना झाली. थोड्याच वेळात पुईखडी येथे उभे रिंगण पार पडणार आहे. दिंडीच्या अग्रभागी विणेकरी, तुळसी वृंदावन घेतलेल्या सुवासिनी आणि पताका घेवून वारकरी सामिल झाले होते. प्रत्येक गावगावात दिंडीचे स्वागत होत होते.

वारकऱ्यांची दिंडी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे मार्गस्थ

ABOUT THE AUTHOR

...view details