महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambabai temple : नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी अंबाबाई मंदिरात हजारो भाविक; देवस्थान समितीकडून तयारी - भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे

प्रत्येक वर्षीप्रमाणे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताला राज्यात मंदिरांमध्ये काही कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. तसेच, भिविकांची गर्दी पाहता मंदिर व्यवस्थापनाकडून वेळापत्रकात बदलही केले जातात. (New year 2023 ) तसे, यंदाही कोल्हापूर अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी ( devotees visit Ambabai temple on occasion of New Year ) जास्तवेळ खुले ठेवले जाणार आहे. भक्तांनी कोरोनाचे जे काही नियम आहेत ते स्वतः पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. ( Preparation started by Devasthanam Samiti )

Ambabai temple
नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी अंबाबाई मंदिरात हजारो भाविक

By

Published : Dec 30, 2022, 1:13 PM IST

कोल्हापूर: सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वजण नवीन वर्षाची सुरुवात (New year 2023 ) करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाने करत असतात. यावर्षी सुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने त्याचीही विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. ( devotees visit Ambabai temple on occasion of New Year ) त्यानुसार मंदिराबाहेर भक्तांच्या ज्या ठिकाणी रांगा लागतात तिथे मंडप व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. ( Preparation started by Devasthanam Samiti )


यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन्ही वर्षात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. शिवाय प्रत्येक भक्तांना ई पास द्वारेच दर्शन दिले जात होते. सॅनिटायझर चा वापर करूनच मंदिरात सोडले जात होते. शिवाय ठराविक वेळासाठी मंदिर सुरू होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने त्याची सुद्धा काळजी घेण्यात येत आहे. मात्र निर्बंध मुक्तच सद्या भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापूरात येण्याची शक्यता आहे. मात्र तरीही भक्तांनी सुद्धा कोरोनाचे जे काही नियम आहेत ते स्वतः पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती :दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पुन्हा एकदा अनेक निर्बंध काही ठिकाणी सुरू आहेत. कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात सुद्धा कर्मचाऱ्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला विना मास्क मंदिरात येण्यास निर्बंध घालण्यात आले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

निर्बंध मुक्तच :यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन्ही वर्षात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. शिवाय प्रत्येक भक्तांना ई पास द्वारेच दर्शन दिले (Devotees can see through epass only ) जात होते. सॅनिटायझर चा वापर करूनच मंदिरात सोडले जात होते. शिवाय ठराविक वेळासाठी मंदिर सुरू होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने त्याची सुद्धा काळजी घेण्यात येत आहे. मात्र निर्बंध मुक्तच सद्या भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापूरात येण्याची शक्यता आहे. मात्र तरीही भक्तांनी सुद्धा कोरोनाचे जे काही नियम आहेत ते स्वतः पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासन :याठिकाणी आगामी कोरोना लाटेच्या शक्यतेने संत गजानन महाराज मंदिर प्रशासनाने अजून तरी कुठलेही निर्णय घेतले नाहीत. मात्र, दर्शनासाठी येणारे भाविक मात्र स्वतः खबरदारी घेतानाच चित्र आहे. अनेक भाविक हे मास्क वापरत असून कोरोना नियमांचे पालन करतानाही दिसत आहेत. कोरोना पुन्हा उंबरठ्यावर जरी असला या आठवड्यात लाखो भाविक शेगावात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदिर प्रशासन आगामी काळात काही निर्णय घेत का ? याकडे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर मोठ्या मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे (Devotees must use masks) केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details