कोल्हापूर - कसबा बावडा इथल्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू असताना आज दोन बिबट्या सदृश्य पिल्ले आढळून आली. वस्तीपासून जवळच असलेल्या या शेतात बिबट्याची पिले आढळण्याची माहिती समजताच संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण तयार झाले होते. अनेकांनी ही पिले पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पिल्ली बिबट्याची नसून रान मांजराची असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान कसबा बावड्यात बिबट्याची पिले आढळल्याची अफवा सर्वत्र पसरली होती.
नैसर्गिक अधिवासात सोडले -
दोन बिबट्या सदृश्य पिल्ली आढळल्याचे समजताच स्थानिकांनी वनविभागाची संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत ही पिल्ले रान मांजराची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिकांच्या जीवात जीव आला. ही पिल्ले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाने मांजराची पिल्ले असल्याचे स्पष्ट केले, तरी दिवसभर कोल्हापूर शहरात बिबट्याची पिल्ले आढळल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरुच होती.
कोल्हापूर : 'ती' पिल्ले बिबट्याची नसून रान मांजराची; वनविभागाने केले स्पष्ट - कोल्हापूर बिबट्या बातमी
शेतामध्ये ऊस तोडणी सुरू असताना आज दोन बिबट्या सदृश्य पिल्ले आढळून आली. वस्तीपासून जवळच असलेल्या या शेतात बिबट्याची पिले आढळण्याची माहिती समजताच संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण तयार झाले होते.
कोल्हापूर : 'ती' पिल्ले बिबट्याची नसून रान मांजराची; वनविभागाने केले स्पष्ट