महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Union Budget 2022 : सेंद्रिय खाणाऱ्यांसाठी बनवलेला हा अर्थसंकल्प - शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया - Union Budget 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या. मात्र ज्या घोषणा कृषी क्षेत्रासाठी करण्यात आल्या आहेत. त्यावर शेतकरी नाराज आहेत. त्यांच्यामते सेंद्रिय खाणाऱ्यांसाठी बनवलेला 'हा' अर्थसंकल्प (Budget for 2022-23) आहे.

reaction of such farmers
कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाची प्रतिक्रिया

By

Published : Feb 1, 2022, 5:24 PM IST

कोल्हापूर -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेती क्षेत्रासाठी सुद्धा काही घोषणा करण्यात आल्या. मात्र शेतकरी या अर्थसंकल्पावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय सेंद्रिय खाणाऱ्यांसाठी बनवलेला हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागणार नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना शेतकरी

ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी घोषणा -

शेतीच्या संरक्षणासाठी आता ड्रोन वापरण्यासाठी परवानगी (Permission use drones for agricultural protection) देण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, ज्या प्रमाणे तीन कृषी कायदे अदानी आणि अंबानी यांच्यासाठी केले होते. त्याच पद्धतीने हा निर्णय आहे. केवळ ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीचे संरक्षण करण्याची गरज आहे. मात्र देशात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होणार नाही असे रमेश भोजकर यांनी म्हटले आहे.

सेंद्रिय शेतीमालाला वाढीव भाव मिळावा -

अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी स्वागत केले, मात्र जर सेंद्रिय शेती केली तर पिकांना जादा भाव देणे गरजेचे आहे. जर रासायनिक खतांचा वापर करून आम्ही एकरी 40 टन ऊस उत्पादन करू शकतो, मात्र सेंद्रिय शेती केल्यास तेच उत्पादन घटून 15 ते 20 टन इतके होते. तर मिळणारा हमीभाव 3 हजार असेल तर तो वाढवून मिळाला पाहिजे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. ते भरून निघणार असेल तर शेतकरी सेंद्रिय शेतीला तयार आहेत, अशी प्रतिक्रिया सुद्धा अजित पोवार या शेतकऱ्यांने व्यक्त केली.

हेही वाचा :Union Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 'या' घोषणा करण्यात आल्या

ABOUT THE AUTHOR

...view details