महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाचा कहर; मंगळवारी 39 रुग्णांची वाढ - latest corona update on etv

कोल्हापुरात मंगळवारी आणखी 39 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 25 पुरुषांचा तर 14 महिलांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापुरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.

कोल्हापुरात कोरोनाचा कहर
कोल्हापुरात कोरोनाचा कहर

By

Published : May 20, 2020, 8:47 AM IST

कोल्हापूर- दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापुरात मंगळवारी आणखी 39 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 25 पुरुषांचा तर 14 महिलांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे.

गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापुरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, सोलापूरसह विविध जिल्ह्यातील रेड झोनमधून नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 122 रुग्णांपैकी आत्तापर्यंत एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्ह्यात 107 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात एकीकडे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर होता. त्याच कोल्हापुरात आता मुंबई, पुणेसह रेड झोनमधील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या 122 वर पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details