कोल्हापूर - जिल्ह्यात आज (रविवार) 13 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दिलासादायक म्हणजे आज जिल्ह्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. आता जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 83 झाली आहे.
जिल्ह्यात आजअखेर 720 रुग्णांपैकी 629 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 106 अहवालांपैकी 105 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहे. तर, दिवसभरात 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 83 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. विशेष म्हणजे, सकाळपासून एकही नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही.