कोल्हापूर- एकीकडे राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोल्हापुरातील चित्र दिलासादायक आहे. जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरातही 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोल्हापुरातील 726 पैकी 664 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोल्हापुरातील आणखी 13 रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत 664 जणांना डिस्चार्ज
बुधवारी दिवसभरातही 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोल्हापुरातील 726 पैकी 664 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 8 जणांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. त्यामुळे, सध्या 54 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 8 जणांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. त्यामुळे, सध्या 54 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक 180 रुग्ण शाहूवाडी तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ गडहिंग्लजमधील 84 रुग्ण, आजारा 76 रुग्ण, चंदगड 75 रुग्ण, भुदरगड 71 रुग्ण, राधानगरी 66 रुग्ण, कागल 57 रुग्ण, पन्हाळा 27 रुग्ण, कोल्हापूर शहर 27 रुग्ण, करवीर 21 रुग्ण, हातकणंगले 10 रुग्ण, नगरपालिका क्षेत्रात 11 रुग्ण, इतर 8 रुग्ण, शिरोळ 7 रुग्ण आणि सर्वात कमी गगनबावडा 6 रुग्ण असे एकूण 726 रुग्ण आहेत. यातील 664 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.