कोल्हापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात महाविकास आघाडी वर जोरदार टीका केली. या टीकेला जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभा सभेत त्यांना कोणतेच स्थान नाही, 2019 च्या अगोदर लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधात बोलत होते आता ते पलटी मारून बसले आहेत. जनता हे सगळे पाहत आहेत असे सांगताना त्यांनी मनसे आणि एम आय एम पक्ष हे भाजपची बी टीम आहे असा टोला लगावला आहे.
भाजप एक नंबरचा पक्ष असून शिवसेना हा दोन नंबरचा आहे तर राष्ट्रवादी हा तीन नंबरचा असून देखील तीन नंबरचा पक्ष हा पहिल्या दोन पक्षांना फिरवत आहे अशी टीका राज ठाकरे यांनी मेळाव्यात केली. यावर जयंत पाटील म्हणालेकी, शरद पवार यांच्यावर बोलल्या शिवाय त्यांना टीआरपी भेटत नाही म्हणून ते शरद पवार यांच्यावर बोलत असतात जिलेटीन कांड्यानचा शोध अद्याप लागला नाही या त्यांच्या वक्तव्यास आम्ही सहमत असून त्याचा शोध लागला पाहिजे.सध्या हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे गेला असून एनआयएने तपास करायला हवा.