कोल्हापूर - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी शब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपनेते अशिष शेलार यांचा जयसिंगपूर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. या वेळी आशिष शेलार यांचा पुतळा दहन करुन बोंब मारण्यात आली.
आशिष शेलार यांच्या 'त्या' वक्तव्याचा कोल्हापुरात निषेध - News about C M Uddhav Thackeray
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आशिष शेलार यांचा पुतळा दहन करून निषेध करण्यात आला. यावेळी आशिष शेलार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आशिष शेलार यांच्या 'त्या' वक्तव्याचा कोल्हापूरात निषेध
नागरिकत्व दुरुस्ती कायदा या विषयावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आशिष शेलार यांनी एकेरी शब्द वापरला. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निदर्शने होत आहेत. याच पाश्वभूमीवर जयसिंगपूर येथील क्रंती चौकात मंगळवारी आशिष शेलार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.