महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मटण महागले असताना 'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शेळ्यांची चोरी - कोल्हापूर जिल्हा बातमी

जवाहरनगर येथील सुदाम पोळ यांच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोल्हापुरात शेळ्यांची चोरी
कोल्हापुरात शेळ्यांची चोरी

By

Published : Dec 28, 2019, 4:48 PM IST

कोल्हापूर- शहरात पुन्हा एकदा 8 शेळ्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शेळ्या आणि बकऱ्यांच्या चोरीत वाढ झाली आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शेळ्यांची चोरी

हेही वाचा - 'हिम्मत असेल तर गोळ्या घाला'...सीमा प्रश्नावरून कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

जवाहरनगर येथील सुदाम पोळ यांच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मटण दरवाढीसाठी आंदोलन सुरू असलेल्या कोल्हापुरात चक्क मटणासाठी चोऱ्या सुरू झाल्याने एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - 'फायदा कोणाला..? कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करा'

तीन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कारंडे माळ येथील माळावर चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या कळपातील 7 शेळ्या चोरट्यांनी पळविल्या होत्या. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मटण दरवाढविरोधी तीव्र भावनांचा फायदा घेत हा प्रकार घडल्याने या चोरींची सध्या जोरदार चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details