महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या 500 पार; अॅक्टिव्ह 385 - Kolhapur Corona Count

गेल्या 12 तासांमध्ये कोल्हापुरात आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 507 वर जाऊन पोहोचली आहे.

कोल्हापूरातील कोरोनाबाधित
कोल्हापूरातील कोरोनाबाधित

By

Published : May 30, 2020, 3:28 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या 12 तासांमध्ये कोल्हापुरात आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 507 वर जाऊन पोहोचली आहे.

शाहुवाडीतील एकूण रुग्णांची संख्या आता 150 झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरात आ्तापर्यंत एकूण 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 385 झाली आहे.

गेल्या 12 तासांत सर्वाधिक रुग्ण हातकलंगले आणि शाहूवाडी तालुक्यातील आढळले आहेत. हातकणंगलेमध्ये 11 तर शाहुवाडीत एकूण 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांचा विचार केला तर त्यामध्ये वयोगटानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे : 1 वर्षांखालील - 1, 1 ते 10 वर्ष - 45, 11 ते 20 वर्ष - 65, 21 ते 50 वर्ष - 345, 51 ते 70 वर्ष - 40 आणि 71 वर्षांवरील - 1 असे एकूण - 507 कोरोना रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details