कोल्हापूर - जिल्हा दूध उत्पादक संघ 'गोकुळ'च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी आज (3 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. यावेळी गोकुळ दूध संघाची, तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
महसूलमंत्री थोरात यांचीही भेट
गोकुळच्या सर्व नूतन संचालकांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीसुद्धा भेट घेतली. यावेळी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. शिवाय, सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
'दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य द्या'
थोरात यांनी यावेळी म्हटले, की 'दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य द्यावे'. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा पालफमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक डॉ. सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील, किशन चौगुले, नंदकुमार ढेंगे आदी उपस्थित होते.
हेही वाचा -राज्याभिषेक सोहळा घरातूनच साजरा करा; मी ठरल्याप्रमाणे राजसदरेवरून पुढील दिशा घोषित करेन - संभाजीराजे