कोल्हापूर - एटीएममधून रिटर्न आलेले पैसे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सुनील शहा यांचा शाहूपुरी पोलिसांनी सत्कार केला. दुसऱ्याचे पैसे परत करून आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.
एटीएममधील रिटर्न आलेली रक्कम प्रामाणिकपणे केली परत; पोलिसांनी केला सत्कार - शाहूपुरी पोलीस
एटीएममधून रिटर्न आलेले पैसे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सुनील शहा यांचा शाहूपुरी पोलिसांनी सत्कार केला. दुसऱ्याचे पैसे परत करून आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.

जवाहर नगर येथे राहणाऱ्या सलमान दस्थगिर कमते हे बगल चौक येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनवर पैसे भरण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मिळाली नाही. त्यानंतर काही वेळाने शाहूपुरी येथील सुनील शहा हे याच मशीनवर पैसे भरण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना कमते यांची परत आलेली २५ हजारांची रोकड मिळाली. पण शहा यांनी ते पैसे परस्पर घेऊन न जाता बँक अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तसेच शाहूपुरी पोलिसांत प्रामाणिकपणे आपल्याला पैसे मिळ्याल्याची हकीकत सांगितली.
त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत सलमान कमते यांची रक्कम सुनील शहा यांनी परत दिले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सुनील शहा यांचा सत्कार करण्यात आला.