महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईद'च्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जमवलेल्या रक्कमेतून साकारला अतिदक्षता विभाग - india gandhi hospital in kolhapur

कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत इचलकरंजीतील मुस्लीम समाजाने आदर्श घालून दिलाय. रमजान ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत स्थानिकांनी पैसे जमलवले; आणि यातून अतिदक्षता विभाग साकारला आहे.

hospitals in kolhapur
'ईद'च्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जमवलेल्या रक्कमेतून साकारला अतिदक्षता विभाग

By

Published : May 27, 2020, 1:44 PM IST

Updated : May 27, 2020, 8:54 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत इचलकरंजीतील मुस्लीम समाजाने आदर्श घालून दिलाय. रमजान ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत स्थानिकांनी पैसे जमलवले; आणि यातून अतिदक्षता विभाग साकारला आहे. यासाठी तब्बल 36 लाख रुपयांची मदत त्यांनी उभी केली आहे. यातून इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी योगदान दिलं आहे.

'ईद'च्या अनावश्यक खर्चाला फाटा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये समाजातील विविध स्तरांतील नागरिक देखील हातभार लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील मुस्लीम समाजाने रमजान ईद दरम्यान होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जकात, सदका आणि इमदादची रक्कम कोरोना विरोधातील लढाईसाठी देण्याचे ठरवले. बघता बघता तब्बल 36 लाख रुपये जमा झाले आहेत. या रक्कमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. तसेच अन्य आवश्यक वैद्यकीय साधन-सामुग्री देखील पुरवण्यात आली आहे.

रमजान ईदचे औचित्य साधून या वार्डचे लोकापर्ण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कौतुक करत इचलकरंजीतील मुस्लीम समाजाने एक वेगळा आदर्श देशासमोर ठेवल्याचे म्हटले. यापुढे लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सण कसा साजरा करायचा, याचे उत्तम उदाहरण मुस्लिमांनी सर्वांना दाखवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Last Updated : May 27, 2020, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details