महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात ड्रायरनला सुरवात, चार केंद्रावर झाली सुरवात - KOLHAPUR CORONA NEWS

कोल्हापूर जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लस दिली जाणार आहे. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रात 25 कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वाना ही लस देण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शुक्रवारी कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन मोहीमेला सुरवात झाली आहे.

KOLHAPUR VACCINATION DRYRUN START
कोल्हापुरात ड्रायरनला सुरवात

By

Published : Jan 8, 2021, 11:04 AM IST

Updated : Jan 8, 2021, 3:41 PM IST

कोल्हापूर - राज्यभरात कोरोना लसीचा ड्रायरन सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चार ठिकाणी ही लस दिली जाणार आहे. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रात पंचवीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वाना ही लस देण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शुक्रवारी कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन मोहीमेला सुरवात झाली आहे. यापूर्वी 2 जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली आहे.

कोल्हापुरात ड्रायरनला सुरवात, चार केंद्रावर झाली सुरवात
सूचनांनुसार लसीकरणाला सुरुवातकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची ड्रायरन घेण्यास कोल्हापुरात सुरवात झाली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेचे कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, पुलाची शिरोली येथील आरोग्य केंद्र आणि पंचगंगा हॉस्पिटल येथे आवश्यक पूर्वतयारी सुरवात करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची निवड करून ‘कोविन’ ॲपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप व शीतसाखळी केंद्राला कळवणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळवणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती दिली जात आहे.एका केंद्रावर 25 जणांना लसीकरणया ड्रायरनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. कोविन ॲपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना कोरोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या जात आहे.
Last Updated : Jan 8, 2021, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details