कोल्हापूर - कोल्हापूर बायपास मार्गावरील उदगाव अंकली टोल नाक्याजवळ असलेल्या ओढ्यात एक कंटेनर बुडाला. यावेळी सुदैवाने चालक व त्याचा साथीदार या घटनेतून बचावले.
कंटेनर ओढ्यात बुडाला; अंकली टोल नाक्याजवळील घटना - पूर
कृष्णा नदीच्या काठालगत ओढा आहे. सध्या या ओढ्यात कृष्णा नदीचे पाणी आले. दरम्यान, एक कंटेनर कोल्हापूरहून तमदलगे खिंडच्या बायपासमार्गे जात होते. तर ओढ्यामध्ये पाणी आले हे माहीत नसल्याने चालकाने सरळ बायपास मार्गावरून कंटेनर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने कंटेनर थेट ओढ्यामध्ये कलंडला.
कृष्णा नदीच्या काठालगत ओढा आहे. पावसामुळे या ओढ्यात कृष्णा नदीचे पाणी आले. तर हे पाणी ओढ्यातून रेल्वे ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात आले आहे. दरम्यान, राजस्थानहून सांगलीकडे जाण्यासाठी एक कंटेनर कोल्हापूरहून तमदलगे खिंडच्या बायपासमार्गे मध्यरात्री जात होता. तर ओढ्यामध्ये कृष्णेचे पाणी आले हे माहीत नसल्याने चालकाने सरळ बायपास मार्गावरून कंटेनर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने कंटेनर थेट ओढ्यामध्ये कलंडला. सुदैवाने चालक व त्याचा साथीदार या घटनेतून वाचले.
महेंद्रसिंग असे चालकाचे नाव आहे. तर या कंटेनरमध्ये काय आहे याची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. पूर परिस्थितीमुळे जयसिंगपूर पोलीस आणि अंकली टोल नाक्यावर बॅरिकेट्स लावले आहेत. असे असताना मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे बॅरिकेट्स उलटे लावले. त्यामुळे सूचना फलक न दिसल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. दरम्यान, घटनेनंतर याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.