महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरातील बचावकार्यानंतर कोस्टगार्ड जवानांनी घेतले अंबाबाईचे दर्शन - कोल्हापूरच्या बातम्या

पूरस्थितीमध्ये जवानांनी जवळपास पाच ते सहा दिवस बचावकार्य केले. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पूरस्थिती नियंत्रणात आल्याने जवानांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

कोस्टगार्ड जवानांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

By

Published : Aug 13, 2019, 10:05 PM IST

Updated : Aug 13, 2019, 10:59 PM IST

कोल्हापूर- आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांमध्ये जवळपास पाच ते सहा दिवस कोस्टगार्डच्या जवानांनी सतत बचाव कार्य केले. जवानांनी हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. संकटात सापडलेल्या नागिरकांना जवानांनी जीवनदान दिल्याने जणू ते 'देवदूत'च ठरले. पूरस्थिती नियंत्रणात आल्याने जवानांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

कोस्टगार्ड जवानांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

या देवदूतांनी अर्थातच कोसगावच्या जवानांनी मंगळवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुखात, समाधानात आणि आनंदात ठेव, अशी प्रार्थना या जवानांनी अंबाबाईकडे केली.

Last Updated : Aug 13, 2019, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details