कोल्हापूर- विदर्भ-मराठवाड्यात कृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या महिन्याभरात अंदाज घेऊन हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. विदर्भ, मराठवाडा अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची चर्चा सुरू होत्या.
कृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण, महिन्याभरात अंदाज घेऊन करणार प्रयोग - चंद्रकांत पाटील - टेंडर
विदर्भ, मराठवाडा अजुनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे याठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची चर्चा सुरू होत्या.
चंद्रकांत पाटील
कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचबरोबर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केला असता, राज्यात नवीन काही घडत असेल तर माझ्या नावाची चर्चा होतच असते असे म्हणत कोणतेही स्पष्ट वक्तव्य करणे त्यांनी टाळले आहे.