कोल्हापूर - सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत आलेल्या 144 प्राप्त अहवालांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यातील एकूण 16 अहवाल नाकारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 720 आहे तर त्यापैकी 641 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील 10 जणांचा सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांच्या संख्येवर एक नजर -