कोल्हापूर -जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील हजारो शिक्षक आता रस्त्यावर उतरले आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त केलेल्या आणि त्यानंतर 100 टक्के अनुदादानावर आलेल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीला घेऊन, हजारो शिक्षक आपल्या कुटुंबासह कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षण-कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब धरणे आंदोलन
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हभागी झाले होते.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब सहभागी झाले होते. राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त केलेल्या, 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100 टक्के अनुदान असलेल्या शाळा आणि तुकड्यांवरील शिक्षक-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे क्रमप्राप्त असतानाही शासन या सर्वांना नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करत आहे. या विरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र लढा उभारू, असा इशारासुद्धा यावेळी शिक्षकांनी दिला आहे.