महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Shivsena agitation : बंदुकीची भाषा करणाऱ्या व्यापाऱ्यावर फौजदारी कारवाई करा; शिवसेनेची कोल्हापूर बाजार समितीकडे मागणी - Kolhapur Shivsena agitation

कोल्हापूर जिल्हा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्वरित कारवाई न केल्यास कर्नाटकी गुळाचा व्यापार ( Karnataki jaggery as Kolhapur Jaggery in market ) करून भ्रष्टाचार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शिवसेना आपल्या पद्धतीने बंदोबस्त ( Kolhapur Shivsena agitation against trader in APMC ) करेल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यां
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यां

By

Published : Jan 4, 2022, 8:01 PM IST

Updated : Jan 4, 2022, 8:06 PM IST

कोल्हापूर - बनावट कोल्हापुरी गुळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंदुकीची भाषा करणाऱ्या या निलेश पटेल या व्यापाऱ्यावर त्वरित फौजदारी कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच या व्यापाऱ्याचा परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणीदेखील शिवसेनेने केली आहे.

जिल्हयातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर बाजार समितीची स्थापना केली. मात्र, अलीकडील काळात कर्नाटकातून राजरोसपणे कोल्हापूर बाजार समितीत गुळाची आवक सुरू आहे. या कर्नाटकी गुळाची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवली जात नाही. तसेच कर्नाटकी गुळावर 'कोल्हापूरी गुळ' असा शिक्का मारून येथील काही व्यापारी त्याची विक्री ( Fake Kolhapur jaggery sale issue ) करत आहेत. यामुळे कोल्हापुरी गुळाच्या ब्रँडला धक्का बसत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला असता निलेश पटेल नावाचा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला बंदुकीने गोळी मारण्याची भाषा केली होती. यानंतर कोल्हापूर जिल्हा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्वरित कारवाई न केल्यास कर्नाटकी गुळाचा व्यापार ( Karnataki jaggery as Kolhapur Jaggery in market ) करून भ्रष्टाचार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शिवसेना आपल्या पद्धतीने बंदोबस्त ( Kolhapur Shivsena agitation against trader in APMC ) करेल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.

भ्रष्टाचार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शिवसेना बंदोबस्त करेल

हेही वाचा-Liquor Sales in Maharashtra : टाळेबंदीत सरकारी तिजोरीला मिळाला दारूचा आधार

कर्नाटकी गुळावर कोल्हापुरी ब्रँडचा शिक्का मारून विक्री

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कोल्हापुरी गुळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात साखर मिसळून तयार केलेले गूळ येत आहे. अशातच त्यात व्यापाऱ्यांचा अतिरेक म्हणजे त्यावर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोचा वापर करत कोल्हापुरी गूळ असल्याचे शिक्का मारण्यात येत आहे. प्रामुख्याने हा गुळ गुजरातसारख्या दुसऱ्या राज्यात विक्रीसाठी जात असतात. यामुळे मूळ कोल्हापुरी गुळाची नाहक बदनामी होत आहे. सोबतच स्थानिक गूळ उत्पादकांचे आणि शेतकऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे कर्नाटकी गुळाची आवक त्वरित बंद करावी, अशी मागणी शेतकरी आणि शिवसेनेच्यावतीने करण्यात येत आहे. कर्नाटकी गुळावर कोल्हापुरी गुळाचा ब्रँडचा शिक्का वापरू नये, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा-Decision about Colleges : महाविद्यालय सुरू ठेवायची की बंद याबाबत उद्या निर्णय - मंत्री सामंत


जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून बंदुकीची भाषा

बाजार समितीमध्ये होत असलेल्या या काळाबाजारबद्दल एका शेतकऱ्याने संबधित व्यापारीला विचारले होते. तर तेथील निलेश पटेल नावाचा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला बंदुकीने गोळी मारण्याची भाषा केली होती. यामुळे कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबधित व्यापारीवर त्वरित गुन्हा नोंद करावा. तसेच शस्त्र असल्यास त्याचा परवाना रद्द करण्यासंदर्भात बाजार समितीने पोलीस प्रशासनाकडे मागणी करावी, असे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संचालकांना दिले आहे. दरम्यान शिवसैनिका हे संबधित व्यापाऱ्यांच्या दुकानाकडे गेले असता त्याचे दुकान बंद होते.

हेही वाचा-Ashok Chavan on EWS: ईडब्ल्यूएसचे फायदे खुल्या वर्गाला मिळू नयेत हा केंद्राचा डाव - अशोक चव्हाण

संबधित व्यापाऱ्यावर फौजदारी कारवाई होणार

शिवसेनेच्या शिष्टमंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील यांना ( Kolhapur Shivsena agitation against trader in APMC ) निवेदन देत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली होती. शिवसेनेची ही मागणी मान्य करत संबधित व्यापारीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे. तसेच कर्नाटकी गुळाला बाजार समितीत बंदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे एकंदरीतच शिवसेनेच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे.

Last Updated : Jan 4, 2022, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details