कोल्हापूर- झूम प्रकल्पातील विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाने मास्क बांधण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालया बाहेर अनोखे आंदोलन केले. शिवसेकडून प्रदूषन नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मास्क आणि काळी पट्टी भेट देण्यात आली.
झूम कचरा प्रकल्पातील विषारी वायूमुळे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर, प्रकल्पातील कचऱ्यामध्ये अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे, परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. पण, याकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पालिकेवर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस देण्याचाच खेळ सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रदूषन नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मास्क बांधायला सांगून आपण एसीमध्ये बसता, असा संतप्त जाब विचारत तुम्हीच मास्क बांधा. शिवाय, एवढा प्रकार घडत असताना तुम्हाला काहीच दिसत नाही. त्यामुळे, तुम्ही डोळ्याला पट्टीही बांधा असे शिवसेने अधिकाऱ्यांना सांगितले.