कोल्हापूर: शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न केल्यास यंदाच्या गळीत हंगामातील कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा :जागतिक बाजारात साखरेचा भाव वाढत चालले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता एफआरपी निश्चित झालेली होती. दोन वर्षपासून आम्ही ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करा अशी मागणी लावून धरली आहे. एफआरपी प्रमाणे उसाला दर मिळाला पाहिजे. घाई-गडबडीत महिन्याभरपूर्वी सरकारने ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली, मात्र अजून 2021-22 चा हिशोब झालेला नाही. हा सरळ सरळ राज्य सरकारचा गलथानंपणा आहे. केंद्राकडून मिळालेल्या एफआरपी मधून कारखान्यांना अतिरिक्त निधी मिळाला आहे. यातून शेतकऱ्यांना अंतिम बिलापोटी किमान 400 रुपये द्यावेत ही मागणी घेऊन, 13 सप्टेंबरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
कर्नाटकने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर अंतिम बिलाबोटी राज्यातील शेतकऱ्यांना 400 रुपये जादा मिळावेत. शेतकऱ्यांना अंतिम बिलापोटी 13 सप्टेंबरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. -राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते