महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजू शेट्टींकडून कृषी कायद्यांची होळी; म्हणाले, शेतकरी एकटा नाहीये हे बंदमधून समजलं - कोल्हापूर राजू शेट्टी भारत बंद न्यूज

'ज्याची मागणीच केली नाही ते कायदे कशाला करता? कायदे करायचेच असतील तर सर्वच घटकांना सोबत घेऊन चर्चा करून कायदे करा. कडाक्याच्या थंडीत आणि काहीही सुविधा नसताना रस्त्यावर शेतकरी उतरले आहेत. आपल्या हक्कासाठी लढत आहेत,' असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर राजू शेट्टी लेटेस्ट न्यूज
कोल्हापूर राजू शेट्टी लेटेस्ट न्यूज

By

Published : Dec 8, 2020, 10:18 AM IST

Updated : Dec 8, 2020, 3:53 PM IST

कोल्हापूर - 'महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे. सर्वच जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनता सोबत आल्यामुळे शेतकरी मोठा आधार मिळाला आणि समजले की या लढाईमध्ये आपण एकटे नाही. केंद्र सरकारने प्रतिष्ठा पणाला लावली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आल्यावर कशाला प्रतिष्ठा पणाला लावता', असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. या वेळी शेट्टी यांनी कृषी कायद्यांची होळी केली. आज कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा १३वा दिवस असून 'भारत बंद' ठेवण्यात आला आहे.

ज्याची मागणीच केली नाही ते कायदे कशाला करता? - शेट्टी

हेही वाचा -आज 'भारत बंद' ... मुंबईत टॅक्सी-रिक्षासह 'या' सेवा राहाणार सुरू

कृषी कायद्यांची होळी

केंद्र सरकारने केलेले नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे. त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषी कायद्यांची होळी केली. शिरोळ येथील आपल्या निवस्थानाबाहेर त्यांनी या विधेयकाची होळी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, कृषी कायद्याच्या विरोधात आज भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. त्याला राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

राजू शेट्टींकडून कृषी विधेयकाची होळी
देशातील नागरिक शेतकाऱ्यांसोबत असल्याचे मोठं समाधानमहाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पळाला जात आहे. सर्वच जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनता सोबत आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून या लढाईमध्ये आपण एकटे नाही हे सुद्धा समजलं असल्याचे सुद्धा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे. केंद्र सरकारने प्रतिष्ठा पणाला लावलीये

'केंद्र सरकारने या प्रश्नांबाबत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आल्यावर कशाला प्रतिष्ठा पणाला लावता? ज्याची मागणीच केली नाही ते कायदे कशाला करता? कायदे करायचेच असतील तर सर्वच घटकांना सोबत घेऊन चर्चा करून कायदे करा. कडाक्याच्या थंडीत आणि काहीही सुविधा नसताना रस्त्यावर शेतकरी उतरले आहेत. आपल्या हक्कासाठी लढत आहेत,' असे शेट्टी यांनी म्हटले आहे. सरकारने यावर विचार करून कायदे रद्द करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठिशी; आज बाजार राहणार बंद

Last Updated : Dec 8, 2020, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details