महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारित्र्यहिन सदाभाऊंचे हातही अस्वच्छच; तडजोडीच्या मुद्यावरून राजू शेट्टींचे टीकास्त्र

शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत असून शेट्टी यांच्याशी तडजोडीसाठी तयार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले होते. मात्र, खोत यांच्या या विचाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीकात्मक प्रत्युत्तर दिले आहे.

राजू शेट्टींचे टीकास्त्र
राजू शेट्टींचे टीकास्त्र

By

Published : Nov 16, 2020, 5:46 PM IST

Updated : Nov 16, 2020, 6:46 PM IST

कोल्हापूर - स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या लोकांनाच स्वाभिमानी शेतकरी संघटना जवळ करते. ज्यांना समिती नेमून पक्षातून हाकलून लावले, त्यांना पुन्हा संघटनेत घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ यांच्याकडे स्वच्छ चारित्र्यही नाही आणि स्वच्छ हातही नाहीत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुन्हा राजू शेट्टी यांच्याशी तडजोड करायला तयार असल्याचे विधान एका टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेट्टी यांनी विधान केले.

तडजोडीच्या मुद्यावरून राजू शेट्टींचे टीकास्त्र

शेट्टी यांच्याशी तडजोडीसाठी तयार-

पुणे पदवीधर मतदार संघावरून भाजप आणि रयत क्रांती संघटनेत सुरू असलेले राजकारण अखेर एका वेगळ्याच चर्चेवर येऊन ठेपले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना अखेर पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्याशी गट्टी करण्याचे सुतवाच केले आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत असून शेट्टी यांच्याशी तडजोडीसाठी तयार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी बोलले आहेत. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. त्यावर शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

पुतना मावशीचे प्रेम-

शेट्टी म्हणाले, ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकलून दिले अशा लोकांना पुन्हा संघटनेत घेण्याची इच्छाच नाही. ज्या शेतकऱ्यांचा बद्दल तुम्ही कळवळा व्यक्त केला आहे, त्या शेतकऱ्यांचे कडकनाथ घोटाळ्यातील पैसे परत करा, असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. केवळ पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये, ज्या पक्षात ते सध्या आहेत. तिथूनच काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. म्हणून काहीतरी बोलत असतात, अशी टीका देखील राजू शेट्टी यांनी केली.

Last Updated : Nov 16, 2020, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details