कोल्हापूर -गेल्या अनेक दिवसांपासून पत्रव्यवहार झाले, मात्र केवळ आश्वासन दिले गेले. म्हणूनच आता आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti Agitation in Kolhapur ) यांनी म्हटले. ते मोर्चानंतर ईटीव्ही भारतशी बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी विविध मागण्यांसाठी संघटनेने ( Swabhimani Agitation in Kolhapur ) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की आजच्या मोर्चाच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांबाबत असलेला असंतोष ( Raju Shetti on farmers issue ) व्यक्त करत आहोत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारासुद्धा शेट्टींनी यावेळी व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा हेही वाचा-Raju Shetti Criticize Satej Patil : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असताना पालकमंत्री मात्र गायब; 14 फेब्रुवारीला मोर्चा काढणार - राजु शेट्टी
या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या-
- चालू गळीत हंगामात उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये मिळावा.
- रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ तात्काळ रद्द करा.
- भूमी अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करा.
- सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून लाईट दिवसाला 10 तास मिळावी.
- नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजारांचे अनुदान तात्काळ अदा करा.
पालकमंत्र्यांनी आंदोलनाचा फेरविचार करण्याचे केले होते आव्हान
नुकतेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की विजेची 60 हजार कोटी थकबाकी ( Electricity bill issue in Kolhapur ) आहे. चालू बिल भरून सहकार्य करावे, अशी चर्चा शेट्टी यांच्यासोबत झाली होती. पैसे वसूल झाले नाहीत तर राज्य अंधारात जाईल अशी भीती ऊर्जा मंत्र्यानी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेट्टींनी आंदोलनाचा फेरविचार करावा, अशी विनंती असेल असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif on electricity issue ) यांनी म्हटले होते.
हेही वाचा-Hasan Mushrif on Agitations in Kolhapur : राजू शेट्टी तसेच संभाजीराजेंनीही आंदोलनाचे निर्णय थांबवावेत - हसन मुश्रीफ