महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांचं शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीसाठी येत्या 8 जानेवारीला देशभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून 8 तारखेलाच शेतकऱ्यांच्या मनात किती रोष आहे. हे सरकारला समजेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

By

Published : Jan 4, 2020, 7:27 PM IST

राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना
राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोल्हापूर- शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिल्यांदा बघा, जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून? शेवटी आयातच करावं लागेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. दरम्यान, 8 जानेवारीच्या नियोजित आंदोलनाच्या नियोजनाबाबत आज कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

राजू शेट्टी, स्वाभिमानी संघटना

भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीसाठी येत्या 8 जानेवारीला देशभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून 8 तारखेलाच शेतकऱ्यांच्या मनात किती रोष आहे. हे सरकारला समजेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सरकारने जाहीर केलेल्या २ लाखांच्या कर्जमाफीत ज्याचे प्रत्यक्षात नुकसान झाले आहे. ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे सरसकट ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा, म्हणून शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यत पोहोचवण्यासाठी ८ तारखेला आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची निवडही करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या किमान समान कार्यक्रमात १० रुपायात शिवभोजन देण्याची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details