महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य बँकेच्या संचालकांवरील गुन्ह्याचा निःपक्षपातीपणे तपास करावा - राजू शेट्टी - कोल्हापूर, सांगलीतील महापुर

शेतकऱ्यांचे कोल्हापूर, सांगलीतील महापुरामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी फसवे आदेश काढले असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्याविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी

By

Published : Aug 28, 2019, 7:57 AM IST

कोल्हापूर- राज्य बँकेच्या तत्कालीन संचालकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सकृतदर्शनी कोणताही गैरप्रकार दिसत नाही. या गुन्ह्यांच्या तपास होणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल झाला म्हणजे आरोप सिद्ध होत नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. मंगळवारी ते कोल्हापुरात बोलत होते.

राज्य बँकेच्या संचालकांवरील गुन्ह्याचा निःपक्षपातीपणे तपास करण्याची मागणी करताना राजू शेट्टी

हे वाचलं का? -पूरग्रस्तांची कर्जमाफी निकषांच्या कचाट्यात; राजू शेट्टींनी केला फसवणुकीचा आरोप

शेतकऱ्यांचे कोल्हापूर, सांगलीतील महापुरामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी फसवे आदेश काढले असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्याविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत. तसेच मोर्चामध्ये शेतकरी देखील सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का? -'पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, मात्र दोन वर्षांपूर्वीच्या कर्जमाफीची रक्कम अजून हाती नाही'​​​​​​​

राज्य बँकेच्या तत्कालीन संचालकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे एकदाच काय ते 'दूध का दूध, पाणी का पाणी' होऊन जाऊ दे. राज्य बँकेत सकृतदर्शनी कोणताही गैरप्रकार झालेला दिसत नाही, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत. मात्र, तपास यंत्रणांनी निःपक्षपातीपणे तपास करणे गरजेचे आहे. त्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईलच, असे राजू शेट्टी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details