ईटीव्ही भारत विशेष : गोकुळ दूध संघावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा परिणाम; दुधाचे संकलन ५० हजार लिटरने कमी - कोल्हापूर दूध बंद आंदोलन
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, दूध भुकटी निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देऊन केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, शिवाय दूध उत्पादनावरील 12 टक्के जीएसटी रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले. याचा गोकुळ दूध संघावर सुद्धा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
![ईटीव्ही भारत विशेष : गोकुळ दूध संघावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा परिणाम; दुधाचे संकलन ५० हजार लिटरने कमी swabhamani agitation kolhapur swabhimani milk ban agitation swabhimani agitation effect on gokul गोकुळ दूध संघावर आंदोलनाचा परिणाम कोल्हापूर दूध बंद आंदोलन स्वाभिमानी आंदोलन कोल्हापूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8111414-978-8111414-1595320851025.jpg)
गोकुळ दूध संघावर स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम
कोल्हापूर - संपूर्ण राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन पुकारले आहे. काही ठिकाणी टेम्पो आणि टँकरमधून दूध रस्त्यावर फेकण्यात आले आहे, तर अनेक दूध उत्पादकांनी डेअरीमध्ये दूधच घातले नाही. याचा राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघावर म्हणजेच कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर सुद्धा परिणाम झाला आहे. जवळपास 50 हजार लिटर दूध संकलन आज कमी झाल्याची माहिती गोकुळचे कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
ईटीव्ही भारत विशेष : गोकुळ दूध संघावर स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; दुधाचे संकलन ५० हजार लिटरने कमी