कोल्हापूर - तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी केली टाळाटाळ केल्याने, पन्हाळा तालुक्यातील जय डवंग यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती.
प्रकरण मंजूर होऊनही सहकार्य करत नसल्याने. जय याने हे पाऊल उचलले होते. आत्महत्येप्रकरणी बँक निरीक्षक राजेंद्र बेलेकर व शाखा अधिकारी नामदेव खोत यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र आनंदा बेलेकर (रा. कळे बँक निरीक्षक, केडीसीसी बँक, शाखा पुनाळ) व नामदेव गुंडा खोत रा. खोतवाडी (शाखाधिकारी, केडीसीसी बँक) या संशयितांवर कळे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मृत तरुणाचे वडिल बाळासाहेब भिवा डवंग रा. माजनाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
फाईल मंजूर होऊनही पैसे न दिल्याने तरुणाची आत्महत्या, बँकेच्या शाखा अधिकाऱ्यासह निरीक्षकावर गुन्हा दाखल - Annasaheb Patil Economic Development Corporation
आत्महत्येप्रकरणी जिल्हा बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने, पन्हाळा तालुक्यातील जय डवंग यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. प्रकरण मंजूर होऊनही सहकार्य करत नसल्याने. जय याने हे पाऊल उचलले होते.
पैसे न देण्यामागे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नव्हते
माजनाळ येथील मयत जय बाळासाहेब डवंग यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून डेअरी फार्मसाठी केडीसीसी बँक शाखा पूनाळकडे कर्जासाठी फाईल दाखल केली होती. कर्ज प्रकरणास तीन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली होती. परंतु, पुनाळ (ता. पन्हाळा) येथील केडीसीसी बँक शाखेत कार्यरत असणारे बँक निरीक्षक राजेंद्र आनंदा बेलेकर व शाखाधिकारी नामदेव खोत गेले तीन महिने पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. पैसे न देण्यामागे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नव्हते. त्यामुळे मयत जय हा तरुण तणावाखाली होता. याच निराशेतून त्याने (दि. 20 ऑगस्ट)रोजी विषारी औषध प्राशन केले. कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, (23 ऑगस्ट)रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत राजाराम पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, मयत जयचे वडील बाळासाहेब डवंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दोघांवर कळे पोलिसात मंगळवारी (दि. १४) गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे अधिक तपास करत आहेत.