कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ( Swabhimani Shetkari Sanghatana ) दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन ( sugarcane stop movement ) करण्यात येत आहे. मात्र, या आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी आता मंत्र्यांना मैदानात भेटणार असल्याचे म्हटले आहे. सरकारला आमच्या आंदोलनाची दाखल घ्यावी वाटत नसेल तर आम्ही मंत्र्याना मैदानात भेटू.सरकारला जागे करण्यासाठी 25 नोव्हेंबरला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty, president of Swabhimani Farmers Association ) यांनी दिले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारचे आंदोलनाकडे लक्ष नाही - राज्य सरकारकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरू असलेले आंदोलनाची दखल घेतली जात नाही असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. आम्ही केलेल्या मागण्या एकदम साध्या आहेत. मात्र, पाहिल्यादाच कोणत्यातरी राज्य सरकारने आमच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही. काटे दुरुस्त करून ते ऑनलाइन करावे. इथेनॉलला 5 रुपये वाढवुन मिळावा, मागील वर्षाचे 200 रुपये मिळावे यावर्षी एकरकमी एफआरपी अधिक 350 रुपये मिळावे अशी मागणी स्वाभिमानी ने केली आहे. एकाबाजूला संजय राऊत याच्या घरामध्ये साडेपाच लाख रुपये सापडले तर ईडी जागी झाली. मग काटे मारीतून 4 हजार 500 हजार कोटी शेतकऱ्यांचे लुटले जातात हे इडीला का दिसत नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.