महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2020, 11:06 AM IST

ETV Bharat / state

...तर हातात कोयता घेणार नाही, राज्यातील ऊसतोड कामगार संपाच्या तयारीत

यंदाचा गळीत हंगाम तोंडावर असताना ऊसतोडणी कामगारांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. ऊस तोडणी कामगारांच्या प्रलंबित मागण्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी हा इशारा दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले असल्याची माहिती कामगार संघटनेचे नेते जाधव यांनी दिली.

labour charges issue
तर हातात कोयता घेणार नाही.

कोल्हापूर- साखर उद्योगाचा यंदाचा गळीत हंगाम तोंडावर आला आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कामगारांनी संपावर जाण्याची तयारी केली आहे.राज्यातील ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या दरात वाढ करावी, सरकारने जाहीर केलेल्या ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करावे, कोरोनापासून सुरक्षितेचा सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय हातात कोयता धरणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने घेतला आहे. याबाबत सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तर हातात कोयता घेणार नाही.
डॉ.जाधव म्हणाले, गेल्या वेळी तोडणी वाहतूक दरवाढीच्या करार तीन वर्षाचा पाच वर्षांचा केल्यामुळे या कामगारांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या कराराची मुदत संपल्यामुळे संघटनेने नवीन करार करण्यासंबंधीच्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांना दिले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली होती. मात्र आश्वासन मिळून देखील अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर राज्य साखर संघाने 10 सप्टेंबर 2019 ला साखर भवन मुंबई येथे सर्व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये नवीन करार तीन वर्षाचा करण्यासंबंधी राज्य साखर संघाचे पदाधिकारी आणि संघटनेच्या प्रतिनिधी यांच्यात सहमती झाली होती. यंदाचा हंगाम 2020 -21 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. राज्यातील महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने तत्पूर्वी सर्व मागण्या संबंधीचा नवीन सामंजस्य करार झाला नाही, तर दिनांक 1 ऑक्टोंबर पासून संप सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या काळात ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, मुक्कादम गाव सोडणार नसल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत. हा आंदोलनाचा पहिला टप्पा ठरवण्यात आला असून सर्व जिल्ह्यांमध्ये तो करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details