महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Workers Strike : बस झालं..! आता एसटी सुरू करा, म्हणत विद्यार्थी उतरले रस्त्यावर; पन्हाळा तालुक्यात निदर्शने - Merge MSRTC In State Governmernt

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बंद ( ST Workers Strike ) असल्याने त्याचा प्रवाशांना, विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. शाळेत वेळेत येऊ शकत नाही आणि घरीही वेळेत जाऊ शकत नाही. नाविलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड तर आम्हाला बसत आहेच, शिवाय आम्हाला असुरक्षित प्रवास करावा लागत असल्याचे म्हणत विद्यार्थीच रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय अनेक प्रवासी या आंदोलनात उतरले असून, 'आता बस झालं, एसटी सुरू करा', अशी मागणी त्यांनी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील कळे येथे विद्यार्थ्यांनी निदर्शने करत ( Students Protest In Panhala ) ही मागणी केलीये.

विद्यार्थी उतरले रस्त्यावर
विद्यार्थी उतरले रस्त्यावर

By

Published : Dec 17, 2021, 10:51 AM IST

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण ( Merge MSRTC In State Governmernt ) करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर ( ST Workers Strike ) आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आम्ही सुद्धा सहन केले मात्र आता बस झालं म्हणत शेवटी विद्यार्थी प्रवासी रस्त्यावर उतरले ( Students Protest In Panhala ) आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन योग्य तोडगा काढावा, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

बस झालं..! आता एसटी सुरू करा म्हणत विद्यार्थी उतरले रस्त्यावर; पन्हाळा तालुक्यात निदर्शने

विद्यार्थी व प्रवाशांची निदर्शने

पन्हाळा तालुक्यातील कळे येथील कुंभारवाडा चौकात विद्यार्थी तसेच प्रवासी यांनी निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी एसटी सेवा सुरु करा. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, एसटी आमच्या हक्काची-सर्वसामान्य जनतेची, अशा प्रकारच्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मनस्ताप
पन्हाळा तालुक्यातील मनवाड गावापासून कळेपर्यंत सुमारे 40 किलोमीटर अंतरावरून काही दिव्यांग विद्यार्थी येतात. त्यांनी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. आम्हाला एसटी बंद असल्याचा मोठा फटका बसत आहे. आमचे आर्थिक, शैक्षणिक नुकसान तर होत आहेच, शिवाय मला नाहक शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित या संपावर तोडगा काढून माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांची कुचंबणा थांबवावी, अशी मागणी सुरज हरी गुरव या विद्यार्थ्याने केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी सुद्धा या संपावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली असून, प्रवाशांचा अंत पाहू नका असे म्हंटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details