महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2021, 7:30 PM IST

Updated : May 24, 2021, 8:11 PM IST

ETV Bharat / state

आमच्या भविष्याशी खेळू नका, राज्यासेवा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा

मराठा आरक्षण कधी मिळायचे ते मिळू द्या, पण राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्यांच्या नियुक्त्या करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

बैठकीवेळचे छायाचित्र
बैठकीवेळचे छायाचित्र

कोल्हापूर - मराठा आरक्षण कधी मिळायचे ते मिळू द्या, आता आम्ही थांबणार नाही, आम्ही लढा देणार. मात्र, या मध्यंतरीच्या काळात राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करा, तसेच मोफत शिक्षण आणि वसतिगृह द्यावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजाच्या तरुणांवर आत्महत्येची वेळ आली आहे. अशी व्यथा आज स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या समोर मांडल्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज (दि. 24) घाटगे यांनी बैठक बोलावली होती.

बैठकीनंतर बोलताना

यावेळी विद्यार्थी म्हणाले, मराठा आरक्षणाच्या निकालामुळे समाजातील तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. या निकालामुळे समाजावर विपरीत परिणाम होत आहे. समाजातील अनेक मुले राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणानुसार परीक्षेत पास झाले आहेत. त्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. अनेकांच्या मुलाखती आणि फिजिकल राहिल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे समाजातील तरुणांवर टांगती तलवार आहे. आरक्षण कधी मिळायचे ते मिळू दे, आम्ही थांबणार नाही आम्ही लढत राहणार, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

त्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यसेवेच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. आज त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे समाजातील तरुणांचे मोठे नुकसान होत असून अनेक तरुणांचे वय जास्त (एजबार) होत आहे. आरक्षणाला किती वेळ लागणार हे माहिती नाही. पण, या काळातील उपाययोजना काय असाव्यात, अशी चर्चा यावेळी करण्यात आली, असे घाटगे यांनी सांगितले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू करणार असून त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना संघटित करणार आहे. येत्या काळात युवक एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवतील. पुढील दोन दिवसात या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.

हेही वाचा -उचंगी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न 15 जूनच्या आत मार्गी लावा - जयंत पाटील

Last Updated : May 24, 2021, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details