महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Radhanagari Dam Kolhapur : राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने पाण्याचा विसर्ग; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ - Kolhapur Dam Accident

राधानगरी धरणाच्या दरवाजांचे ( Radhanagari Dam Kolhapur Accident ) तांत्रिक काम सुरू असताना एक दरवाजा उघडून अडकल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांनी आज कामानिमित्त नदीकडे जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Radhanagari Dam Kolhapur
राधानगरी धरण

By

Published : Dec 29, 2021, 11:33 AM IST

Updated : Dec 30, 2021, 4:08 PM IST

कोल्हापूर - राधानगरी धरणाच्या दरवाजांचे (Radhanagari Dam Kolhapur ) तांत्रिक काम सुरू असताना एक दरवाजा उघडून अडकल्याची (Stuck gate of Radhanagari Dam ) घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू ( Discharge of Water ) झाला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांनी आज कामानिमित्त नदीकडे जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी-कर्मचारी दरवाजे बंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून एक पथक कोल्हापूरहून राधानगरीकडे रवाना झाले आहे.

पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ -

धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम करत असताना आज सकाळी पाच नंबरचा मुख्य दरवाजा उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात अंदाजे ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी पथके रवाना झाली आहेत. तर तत्काळ या याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे. दुपारपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून हे मुद्दाम घडवलं आहे किंवा चुकून घडले आहे, याबाबतची चौकशी करू असे मुश्रीफ म्हणाले आहेत. तर शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

प्रशासनाकडून नागरिकांसाठी आवाहन -

नदी पात्रातील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील गावांतील नागरिकांनी नदीवर जनावरे, कपडे धुण्यासाठी जाऊ नये. राधानगरीपासून कोल्हापूरपर्यंत असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यासाठी बर्गे घातले असल्यामुळे नदीमधील पाण्याची पातळी वाढणार असून पाणी उपसा करणाऱ्या मोटरी बुडण्याची शक्यता आहेत. तर नदीच्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील पब्लिक अड्रेस सिस्टीम द्वारे सावध करण्यात आले आहे.

Last Updated : Dec 30, 2021, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details