महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात 15 ते 23 मेदरम्यान कडक लॉकडाऊन; केवळ 'हेच' सुरू असणार

कोल्हापुरात 15 ते 23 मे दरम्यान कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात काय सुरू

By

Published : May 14, 2021, 7:36 PM IST

Strict lockdown in Kolhapur from May 15 to 23
कोल्हापूरात 15 ते 23 मे दरम्यान कडक लॉकडाऊन; केवळ 'हेच' सुरू असणार

कोल्हापूर - वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 15 मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून 23 मे रात्री 12पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन काळात उद्योग, बँका, खासगी कार्यालय, किराणा आदी गोष्टी पूर्णपणे बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. जिल्ह्यात तब्बल 12 हजारांहून अधिक अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून 3 हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.

कोल्हापूरात 15 ते 23 मे दरम्यान कडक लॉकडाऊन; केवळ 'हेच' सुरू असणार
काय आहेत नियमावली, यावर एक नजर -1) जीवनावश्यक वस्तू - दूध, भाजीपाला आणि गॅस घरपोच सेवा देणे (सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंत) यामध्ये दूध वाहतूक आणि संकलन सेवेला परवानगी देण्यात आली आहे. 2) सर्व वैधकीय सेवा, मेडिकल, औषध निर्मिती करणारे उद्योग आणि त्यांची वाहतूक, वितरण करण्यास परवानगी. 3)ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा करणारे उद्योग 4) शेतीशी निगडित सर्व कामे आणि मान्सूनपूर्व कामे5) इंधन आणि पेट्रोलियम पदार्थ वाहतूक आणि वितरण (अत्यावश्यक कामासाठीच पेट्रोल मिळणार)6) कायदा आणि सुव्यवस्थेसाठी लागणारी सर्व शासकीय कार्यालये7) एटीएम, पोस्ट कार्यालय8) प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र 9) इंटरनेट यंत्रणा, मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालय10) सर्व प्रकारची माल वाहतूक

ABOUT THE AUTHOR

...view details