कोल्हापूर -गिरगावमध्ये गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. दसऱ्यानिमित्त दरवर्षी ही स्पर्धा अयोजित करण्यात येते. ९० ते १२५ किलोग्रॅम वजनाच्या दगडापासून तयार केलेली ही गोलाकार गुंडी उचलण्याचे एक वेगळेच कसब तरुणांच्या पाहायला मिळते. हा दगड उचलून तो मांडीवरून खांद्यावर न थांबता जो जास्त वेळ वर खाली करेल त्याला या स्पर्धेत गुंडी सम्राट किताब देऊन गौरविण्यात येते.
कोल्हापूरच्या गिरगावमध्ये पार पडली गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा; पाहा काय असते ही स्पर्धा - Kolhapur news
गिरगावमध्ये गुंडी उचलण्याची स्पर्धा पार पडते. ९० ते १२५ ग्रॅम वजनाच्या दगडाची गुंडी उचलनाऱ्या विजेत्या स्पर्धकाला बक्षीस देण्यात येते.
आकाराने गोल असल्याने ही गुंडी कधीही हातातून निसटू शकते. मात्र मांडी, पोट, यावर स्थिर करत खांद्यावर ती अत्यंत कुशलतेने घेऊन जाण्यात गावातील काही तरुण माहीर आहेत. अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी होत असतात. विजेत्या स्पर्धकाला विशेष असे बक्षीस आणि सन्मानचिन्हही देण्यात येते. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित असतात. अवघे 19 वय असलेल्या ओंकार रामचंद्र पाटील याने तब्बल 13 वेळ गुंडी वर खाली करत या स्पर्धेत विक्रम प्रस्थापित करत गुंडी सम्राटचा किताब मिळविला. मन, मनगट आणि बुद्धीचा मिलाप साधत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या स्पर्धेची ही दृश्ये खास ईटीव्ही भारतवर.