कोल्हापूर :खरतर घर बांधायला तुम्ही चिरा आणत असाल, आणि तो एसटीतून आला तर, आश्चर्य आहे ना! पण आता हिच आश्चर्य वाटणारी गोष्ट चक्क खरी ठरली आहे. कारण कोकणातील लाल चिरा घेऊन लालपरी काल(सोमवारी) कोल्हापूरात आली आहे. आजवर ट्रकमधून चिरे आणलेले अनेकांनी पाहिले असतील. मात्र, एसटीतून चिरे येतात ही कल्पनाच लोकांना नवल वाटली आहे.
काय सांगताय! चक्क लालपरी घेऊन आली चिरा... - goods transport by state transport bus
राज्यातील मालवाहतूक आता एसटीतून देखील होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगडहून चिरा (लाल दगड) भरुन एसटी ठिकपुर्ली (ता.राधानगरी) येथे आली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असलं तरी, एसटीचा हा प्रयत्न महामंडळाला उभारी देऊ शकतो.
सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले आहे. यात अनेक उद्योग बंद पडले. त्यात एसटी परिवहनावरही आर्थिक संकट कोसळले आहे. राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मालवाहतुकीसाठी पुढे आणल्या आहेत. राज्यात अशा 350 बसेस तयार करण्यात आल्या आहेत. त्यासाठी या लालपरींची तशी रचनाही करुन घेतली आहे. त्यामुळे राज्यातील मालवाहतूक आता एसटीतून देखील होणार आहे. पण, बुधवारी याच्या पहिला प्रवासाला कोकणातून सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगडहून चिरा (लाल दगड) भरुन एसटी ठिकपुर्ली (ता.राधानगरी) येथे आली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असलं तरी, एसटीचा हा प्रयत्न महामंडळाला उभारी देऊ शकतो.
कोल्हापुरातून चिऱ्यासाठी एसटीच्या मालवाहतूक गाडीची मागणी झाली. त्याला लगेच प्रतिसाद देत आम्ही व्यवस्था केली. यापुढेही अशी सेवा महामंडळाकडून बजावली जाईल. लोकांनी देखील त्याला प्रतिसाद द्यावा, असे सिंधुदुर्ग विभागाचे डीटीओ अभिजित पाटील यांनी सांगितले.