कोल्हापूर-राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, नाहीतर राज्यात आत्महत्या वाढतील, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा,अन्यथा आत्महत्या वाढतील- संभाजीराजे
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.
राज्यातील शेतकरी आधीच कोरोनाच्या संकटामुळे डबघाईला आहे. अशातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी घरात बसून होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात परतीच्या पावसाने शेतातील उभे पीक वाळून गेले आहे. अशा स्थितीत सरकारने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मदतीचा ओघ सुरू केला होता. त्याप्रमाणेच कोल्हापूरवासीयांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.