महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

State Excise Action : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 18 लाख किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त - liquor seized

कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने ( State Excise Department ) कारवाई करत एकूण 18 लाख 23 हजार 700 रुपये किंमतीचा मद्यसाठा त्यांनी कारवाई दरम्यान जप्त ( liquor seized ) केला आहे. कारवाई दरम्यान, आरोपींनी वाहने पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले आहे.

RTU
राज्य उत्पादन शुल्क

By

Published : Jul 3, 2022, 4:04 PM IST

कोल्हापूर -राज्य उत्पादन शुल्क विभागा ( State Excise Department ) च्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ते उजळवाडी भागात थरारक पद्धतीने पाठलाग करत उजळाईवाडी येथे एकूण 18 लाख 23 हजार 700 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त ( liquor seized ) केला आहे. कारवाई दरम्यान, गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करताना तीन संशयतांना रंगेहात पकडले ( Three Suspects Were Caught Red Handed ) आहे. सोबत दोन चार चाकी ही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई 3 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात येत होती. गुन्ह्यातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग

पाठलाग करत घेतले ताब्यात - महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. ह्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आजरा तालुक्यात सापळा लावला होता. या दरम्यान, एक मालवाहतूक करणारा टेम्पो गाडी क्रमांक MH 13 DQ 0756 आणि एक स्विफ्ट डिझायर कार ( Swift Desire ) गाडी क्रमांक MH 13 CS 6926 या दोन्ही चार चाकी आंबोली घाटातून कोल्हापूरकडे येत असताना आढळल्या. संशयास्पद हालचाली आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्यांना तेथे रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने सदर गाड्या न थांबवता त्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग करत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उजळाईवाडी येथे त्यांना रंगेहात पकडले.

सर्व संशयित सोलापूरचे -दरम्यान सदर गुन्ह्यात 2 चार चाकी सह एकूण 120 बॉक्स विदेशी ब्रँडचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. या सर्वांची एकूण किंमत 18 लाख 23 हजार 700 रुपये आहे. संशयित आरोपी वैजनाथ चन्नाभसप्पा ढंगापुरे ( वय 35 ) ,अजय विलास लोंढे ( वय 29 ) व अर्जुन रमेश कांबळे ( वय 27 ) सर्व राहणार सोलापूर या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पथक प्रमुख निरीक्षक पी आर पाटील करत आहेत.

हेही वाचा -Speaker Faces Difficulties : नियुक्ती होताच विधानसभा अध्यक्षां पुढे अडचणी

ABOUT THE AUTHOR

...view details